Thursday, 21 May 2015

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.1 जुलै, 2014 ते दि. 31 जानेवारी, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.1 जुलै, 2014 ते दि. 31 जानेवारी, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत शासनाने निर्णय जाहिर केला आहे. हा फरक कर्मचाऱ्यांना माहे मे २०१५ च्या वेतनामध्ये मिळणार आहे.




Sunday, 3 May 2015

केंद्रशासनाच्या दोन नवीन योजना सुरु... वार्षिक हप्ता रुपये ३४२/- मध्ये ४ लाख रुपयाचे विमा संरक्षण..

केंद्र शासनाने दोन नवीन योजना सुरु केल्या आहेत...

१) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

रुपये ३३० वार्षिक हप्ता
लाभार्थी वयोगट १८ ते ५०
लाभ - मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो

२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

रुपये १२ वार्षिक हप्ता
लाभार्थी वयोगट १८ ते ७०
लाभ - जखमी झाल्यास १ लाख रुपये व मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो

दोन्ही योजनेचा लाभ तुम्ही एकत्रित रित्या घेवून रुपये ३४२ च्या वार्षिक हप्त्यामध्ये ४ लाख रुपयांचे संरक्षण मिळवू शकता. लवकरात लवकर तुमच्या बँकेशी संपर्क साधा...