Sunday, 3 May 2015

केंद्रशासनाच्या दोन नवीन योजना सुरु... वार्षिक हप्ता रुपये ३४२/- मध्ये ४ लाख रुपयाचे विमा संरक्षण..

केंद्र शासनाने दोन नवीन योजना सुरु केल्या आहेत...

१) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

रुपये ३३० वार्षिक हप्ता
लाभार्थी वयोगट १८ ते ५०
लाभ - मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो

२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

रुपये १२ वार्षिक हप्ता
लाभार्थी वयोगट १८ ते ७०
लाभ - जखमी झाल्यास १ लाख रुपये व मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो

दोन्ही योजनेचा लाभ तुम्ही एकत्रित रित्या घेवून रुपये ३४२ च्या वार्षिक हप्त्यामध्ये ४ लाख रुपयांचे संरक्षण मिळवू शकता. लवकरात लवकर तुमच्या बँकेशी संपर्क साधा...


 


Monday, 6 April 2015

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS - Old DCPS) कार्यपद्धती

राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागु असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजनेबाबतची (स्तर-1) कार्यपध्दती शासनाने विहित केली असून त्याबाबत सविस्तर शासन निर्णय आज जारी केला आहे. ही योजना १ नोव्हेंबर २००५ पासून राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे. सोबत शासन निर्णय जोडला आहे..

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS - Old DCPS) कार्यपद्धती