Wednesday, 25 February 2015

शासकीय कर्मचाऱ्यांनो तुमच्या विरुद्ध निनावी व खोट्या तक्रारी आल्यास घाबरु नका.. शासन तुमच्या बरोबर आहे...

निनावी व खोटया तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी याबाबत करावयाची कार्यवाही...

निनावी व खोटया तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतची माहिती संदर्भिय शासन परिपत्रकान्वये दिलेल्या आहेत. केंद्र शासनाने दिनांक 18.10.2013 च्या शासन ज्ञापनान्वये निनावी व खोटया तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी आणि सार्वजनिक हित, प्रसिद्धी व माहिती देणाऱ्यास संरक्षणाबाबचे आदेश 2004 (PIDPI) यामधील सूचना विचारात घेऊन कशा प्रकारे कार्यवाही करावी याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर सूचनांच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत संदर्भाधिन शासन परिपत्रके अधिक्रमित करुन पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

शासन निर्णय दिनांक २५ फेब्रुवारी २०१५

No comments: